'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका'

मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला सूचना

'कोणाच्याही राजकीय सभांना जाऊ नका'

बीड: प्रतिनिधी 

मराठा समाजाला राजकारणात उतरण्यात रस नाही. मात्र, राजकारण्यांकडून समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना ताकद दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही प्रचारसभेला जाऊ नका, अशी सूचना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केली आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात जरांगे फॅक्टर महायुतीसाठी धोकादायक ठरला. त्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला तर महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करू शकली. याचे मोठ्या प्रमाणात श्रेय जरांगे फॅक्टरकडे जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजाकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना सभा आयोजित करणे मुश्किल होणार आहे. 

पुन्हा एकदा आमरण उपोषण

हे पण वाचा  ... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद

आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. राज्यकर्त्यांकडून तो पूर्ण केला जाणार नसेल तर 17 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आपला समाज जीव तोडून आरक्षणाची वाट बघत आहे. आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची आशा तुम्हीच आहात, अशा समाजाच्या माझ्याबद्दल भावना आहेत. अशावेळी जर सरकार आरक्षण देणार नसेल तर मला संघर्ष करावाच लागेल. प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल. मात्र, अशा परिस्थितीत तुम्ही खचून जाऊ नका. राज्यात काही ठिकाणी आपलेच लोक आपल्याच विरोधात आंदोलने करीत आहेत. आपल्यात फूट पाडली जात आहे. अशावेळी अतिभावनिक होऊ नका, आणि सावध रहा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी समाजाला केले 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt