अंगणवाडी सेविकांचे साताऱ्यात धरणे आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे साताऱ्यात धरणे आंदोलन

मानधन वाढीसह पेन्शन मंजुरीची केली मागणी

 

सातारा : सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले .या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करून त्यांना पेन्शन मंजूर करण्यात यावी व लाडकी बहीण योजनेच्या कामाचे भत्ते तात्काळ मिळावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे .

अंगणवाडी  सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे, अध्यक्ष अर्चना अहिरेकर, उपजिल्हाध्यक्ष मालन जाधव, तालुकाध्यक्ष छाया पन्हाळकर, सरचिटणीस सुरेखा शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली . 9 जुलै 2025 रोजी राज्यातील विविध संघटनांनी एक दिवसीय संपाचे आवाहन केले होते त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने या आंदोलनात सहभाग घेतला होता अंगणवाडी सेविकांना 26 हजार रुपये मानधन आणि मदतनीस यांना 18 हजार रुपये मानधन याशिवाय नोकरी पश्चात पेन्शन महागाईचा विचार करता मंजूर करावी, एफ आर एस च्या तांत्रिक अडचणी सोडवल्या जाव्यात अंगणवाडी केंद्रात चार वाजेपर्यंत बसण्याची सक्ती मागे घ्यावी पोषण आहाराची माहिती ऑनलाईन भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, शासनाने या कामाची ऑफलाइन पद्धत पुन्हा लागू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या

हे पण वाचा  कामगार कायद्यांविरोधात कराडात विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांची निदर्शने

आपल्या विविध मागण्यांचे फलक अंगणवाडी ताईंनी झळकावून राज्य शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले .लाडकी बहीण योजनेचे कामाचे भत्ते अद्याप मदतनीस भगिनींना मिळालेले नाही अंगणवाडी  सेविकांना द्यायची 50% रक्कम अद्याप प्रलंबित आहे ती सुद्धा तातडीने अदा केली जावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt