श्री मळाईदेवी पतसंस्थेतर्फे वाहन वितरण
कराड : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कमी व्याजदर या योजनेअंतर्गत वाहन तारण कर्ज वितरण करण्यात आले. याप्रसंगी वाहनाचे पूजन संस्थेचे संचालक शामराव पवार व सल्लागार दत्तात्रय लावंड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र वाहन विक्री वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसाठी 12 टक्के व्याजदराने त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा श्री मळाईदेवी पतसंस्थेने केली आहे. सदर योजनेचा लाभ संस्थेच्या सोमवार पेठ व शास्त्रीनगर शाखेतील कर्जदार यांनी घेतला. वाहने ही सर्वसामान्यांची गरज झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे देशात उत्पन्न वाढत असून खरेदीही वाढत आहे. संस्थेच्या सभासदांना वाहने खरेदी करण्यासाठी ही प्रोत्साहन पर योजना आखली आहे, या योजनेचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री मळाईदेवी पतसंस्थेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रक्कम 283 कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेस सन 2024-25 या आर्थिक वर्षांत 4 कोटी 19 लाखांचा ढोबळ नफा असून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यातही संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहण्यासाठी संस्थेने एनपीएची तरतूद सहकार कायद्यानुसार पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्था लाभांश देणार असल्याचे मत संस्थेचे चेअरमन अजित थोरात व व्हॉ. चेअरमन चंद्रकांत टंकसाळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक व सल्लागार मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव शिंदे, शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000