- राज्य
- '... तर गोळ्या खाण्यासाठी ही मागेपुढे बघणार नाही'
'... तर गोळ्या खाण्यासाठी ही मागेपुढे बघणार नाही'
जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
On
मुंबई: प्रतिनिधी
मराठा समाजातील नवयुवकांचे आयुष्य घडवण्यासाठी आपण रणांगणात उतरले असून सरकारने सहकार्याची भूमिका सोडून आपल्याला गोळ्या घातल्या तरी आपण माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट इतर मागास प्रवर्गातील आरक्षण द्यावे, सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, मराठा राठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आरक्षण आंदोलकांपैकी मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.
सरकारने आडमुठेपणाची भूमिका सोडून मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे. तसे झाल्यास आम्ही
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गुलाल उधळून त्यांचे अभिनंदन करू. अन्यथा मुंबईतून निघून जाणार नाही. आम्हाला तुरुंगात टाका अथवा आमच्यावर गोळ्या झाडा. आम्ही इथून हरणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने शौचालय आणि खाण्याची दुकाने ही बंद केली आहेत. सरकार आडमुठ भूमिका घेणार असेल तर मराठा समाजही आडमुठी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे यांनी बजावले.
मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हरणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. ओबीसींचे आरक्षण काढून घ्या आणि आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही. मात्र, आम्हाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय आपण इथून हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author
Latest News
31 Aug 2025 13:22:26
मुंबई: प्रतिनिधी
दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी...