'... तर तुम्ही एकमेकांच्यात वाद का घालता?'

एकदिलाने महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरे यांचे आदेश

'... तर तुम्ही एकमेकांच्यात वाद का घालता?'

मुंबई: प्रतिनिधी

मी आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे जर तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकमेकांच्यात वाद का घालता, असा सवाल करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना एकदिलाने महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी परस्परांमध्ये संवाद आणि समन्वय ठेवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

महापालिकेत सत्ता आपलीच

हे पण वाचा  तपासयंत्रणांवरच न्यायालयाने उगारला कायद्याचा बडगा

आपला पक्ष मुंबईत बलवान आहे. पक्षातील सर्व जुन्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घ्या. पक्षापासून दूर गेलेल्यांना ही पुन्हा पक्षात आणून कामाला लावा. एकजुटीने काम केले तर या महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता आपलीच, असा दावा करताना ठाकरे यांनी, हे आपण केवळ टाळ्या आणि शिट्ट्या मिळवण्यासाठी बोलत नसल्याचे नमूद केले. 

मतदारयाद्यांवर काम करा 

महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान मतदारयाद्यांवर लक्ष केंद्रित करा. त्याच्यावर विशेष काम करा. मतदारयाद्या काटेकोरपणे तपासून पहा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली. 

... तर विनाकारण मारहाण नको 

मराठीच्या मुद्द्यावरून विनाकारण मारहाणीपर्यंत उतरू नका. जर कोणाला मराठी बोलता येत नसेल, समजत नसेल, मात्र त्याची मराठी शिकण्याची तयारी असेल तर त्याला मराठी शिकवा. समोरचा माणूस उद्धटपणा करत नसेल तर मारहाण करू नका. उर्मटपणा करणाऱ्यांना मात्र सोडू नका. अशा प्रसंगांचे व्हिडिओ मात्र काढू नका, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt