डेंग्यूबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून जनजागृती

वडगांव नगरपंचायत द्वारे डेंग्यू प्रतिरोध मोहीम

डेंग्यूबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून जनजागृती

वडगाव मावळ/ प्रतिनिधी 
नगरपंचायतीच्या वतीने पावसाळ्यात डासजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.आपला परिसर स्वच्छ ठेवावे. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांनी केले आहे

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. या आजारामध्ये  प्रमुख्याने पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणं,दुसऱ्या प्रकारच्या तापामुळे अर्थात DHF मुळे तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. 

सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणं, सतत तहान लागणं आणि अशक्तपणा व  गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम होऊ शकतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात. जसे संपूर्ण महाराष्ट्रात डेंग्यु चे चित्र दिसत आहे.

त्याचप्रमाणे आपल्या वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात काही रुग्णसंख्या आढळून येत आहेत त्याच अनुषंगाने मा.मुख्याधिकारी यांच्या द्वारे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले

हे पण वाचा  सरकारी बिले न मिळाल्याने कर्जबाजारी कंत्राटदारांची आत्महत्या

आठवड्यातील एक दिवस घरातील पाण्याची भांडी कोरडी करा व आतुन स्वच्छ घासून पुसून घ्या,

रिकाम्या साफ करता येणान्या भांड् यामध्ये तीन दिवतातुन एकदा रॉकेल किंवा डेटॉल टाका.
*  घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा आणि कपड्याने झाका.
* जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्यास प्लास्तिटकच्या वस्तू अशा निरूपयोगी वस्तू घराभोवती ठेऊ नका.
डासांपासून सरंक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा व झोपताना मच्छरदाण्या वापरा
कुलर्स, फ्रिज यामध्ये साचलेले पाणी दर २-३ दिवसांनी काढा व स्वच्छ करा.
नाली मधील पाणी वाहते करा, गटारे, खड्डे नष्ट करा, संडासच्यापाईपला जाळे बांधा.
घराच्या परिसरातील अडगंळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.
कोणताही ताप अंगावर काडु नका, ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या.


वडगाव नगरपंचायत मार्फत डेंग्यु जनजागृतीबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत,नगरपंच्यायात मार्फत 4 टीम तयार करण्यात आल्या असून त्यांचेद्वारे डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर या सारख्या ठिकाणी साचलेले पाणी जास्त दिवस न ठेवता ओतून देणे व जुन्या विहिरी, नाले, मोठ-मोठे खड्डे अशा ठिकाणी साचणाऱ्या पाण्यात डेंग्यु प्रतिबंधात्मक औषधी द्रावण टाकून डेंग्यु या आजारावर नियंत्रण मिळवण्या साठी ह्या अशा काही उपाययोजना नगरपंचायत मार्फत करण्यात येत आहे.


तसेंच शहरात दैनंदिन स्वरूपात कीटकनाशक धूर फरवारणी औषधं फवारणी करण्यात येत आहेव नागरिकांना डेंग्यू व साथीच्या आजाराबाबत सर्व्हे व जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती च्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत.

 

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण' 'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'
बीड: प्रतिनिधी  महादेव मुंडे प्रकरणा त प्रशासन सुरुवातीपासूनच निष्क्रिय राहिले असून प्रशासनाकडून आरोपींची पाठराखंड केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे...
इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?
'भाषेवरून मारहाण करणे नाही खपवून घेतले जाणार'
तुरुंगातून सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
'... तर काय भोक पडणार आहेत का?'
डेंग्यूबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून जनजागृती
'महायुतीला कमीपणा येऊ देणार नाही'

Advt