महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध

पुणे : प्रतिनिधी

'अबकी बार महागाई ची सरकार, महागाईचा झटका, लाडक्या बहिणींना फटका,' अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहरच्या वतीने कसबा पेठेत महागाई विरोधात, विशेषतः गॅस दरवाढी विरोधात आंदोलनात करण्यात आले. 

यावेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी भाजून गॅस दरवाढीचा निषेध केला.  महागाईची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एकेकाळी १० रुपये गॅस वाढला की केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांचे छायाचित्र लावून  'भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे ?' हा उपहासात्मक प्रश्न उपस्थित करण्यात आला.

महागाई थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी लोकांना फसवून २०१४ सालापासून सरकार चालवले आहे. लोकांना महागाईने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत आहे, असे शहरप्रमुख संजय मोरे यावेळी बोलताना म्हणाले. 

हे पण वाचा  उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे अयोग्य: फडणवीस लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे अयोग्य: फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी  निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार...
'... आणि अदानीला शेलू, वांगणीला पाठवू'
पक्ष बांधणीसाठी सरसावले स्वतः उद्धव ठाकरे
'... नाहीतर अशा लोकांची पूजा घालायची का?'
विरोधीपक्ष नेतेपदासाठी विरोधकांचे सरन्यायाधीशांना साकडे
नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची निवड
जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू: सपकाळ

Advt