- राज्य
- कला केंद्र गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या भावावर गुन्हा
कला केंद्र गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या भावावर गुन्हा
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा रोहित पवार यांचा आरोप
पुणे: प्रतिनिधी
केडगाव चौफुला परिसरातील अंबिका लोकनाट्य कला केंद्र झालेल्या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
अंबिका कला केंद्रात बाळासाहेब मांडेकर आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या बेछूट गोळीबारात कला केंद्रातील नर्तिका जखमी झाली आहे. तिच्यासह कला केंद्राच्या संचालकांवर हे प्रकरण दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जबाब टाकला जात आहे, असा रोहित पवार यांचा आरोप आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, सध्याच्या काळात घडलेल्या अनेक प्रकरणांनी महायुती सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांना या प्रकरणामुळे टीकेचे आणखी एक कारण हाती लागले आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय वातावरण तापलेले आहे.