- राज्य
- ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून हल्ला झाल्याचा आरोप
जालना: प्रतिनिधी
जालना येथे जात असताना ज्येष्ठविधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अशा हल्ल्यांना घाबरून आपण आपली भूमिका सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया ॲड. सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.
येथे धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना भेटण्यासाठी सदावर्ते येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
याबाबत माहिती देताना सदावर्ते म्हणाले की, अशा प्रकारचे हल्ले करून कोणीही मला थांबवू शकत नाही. धनगर बांधवांशी माझे रक्ताचे नाते आहे. त्यासाठीच मी येथे आलो आहे. कोणतेही नाटक करण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी येथे आलेलो नाही.
इंग्रजांच्या काळापासून धनगर समाज हा आदिवासी आहे. त्यामुळे आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे, असा दावाही ॲड. सदावर्ते यांनी केला.