'शिवसेना नव्याने धर्मनिरपेक्ष झाली असली तरी...'

महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी एमआयएमचा काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रस्ताव

'शिवसेना नव्याने धर्मनिरपेक्ष झाली असली तरी...'

मुंबई: प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, असा प्रस्ताव मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना दिला आहे. त्याचवेळी शिवसेना हा नव्याने धर्मनिरपेक्ष झालेला पक्ष असला तरीही त्यांची अनेक धोरणे आणि विचार आपल्याला मान्य नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष पक्षांकडे प्रस्ताव दिला असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

शिवसेना उद्धव ठाकरे गट नव्याने धर्मनिरपेक्ष झाला असला तरीही त्यांची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम आपल्याला मान्य नाही. एमआयएमला महाविकास महाविकास आघाडीत सहभागी करून घेणार की नाही हे अंबादास दानवे यांनी स्पष्ट करावे. आम्ही कोणतेही देशद्रोही कृत्य केले असेल तर ते सिद्ध करावे. त्याबद्दल जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी आणि आमच्या देशात रोही कृत्यांबद्दल आपल्याकडे अडीच वर्षे सत्ता असताना कारवाई का केली नाही हेही स्पष्ट करावे, अशा शब्दात जलील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जणू आव्हानच दिले आहे. 

मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडी मुस्लिम उमेदवार देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि एमआयएम यांच्यात मत विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. ही शक्यता टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला. आपल्या मागण्या अवास्तव नाहीत. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण तडजोड करण्यास तयार आहोत. आमचे मतदार संघ आणि उमेदवार निश्चित झाले आहेत. आम्ही पाच जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, आपल्याला महाविकास आघाडीत सहभागी करून घेतल्यास तडजोड करण्याची आपली तयारी आहे, असे जलील यांनी स्पष्ट केले. 

हे पण वाचा  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा

About The Author

Advertisement

Latest News

Advt