आय फाउंडेशन हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

गोयल कुटुंबाकडून मानवसेवेला समर्पित योगदान

 आय फाउंडेशन हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

 पुणे : प्रतिनिधी

समाजसेवा क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलत, गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटल (मित्र मंडळ चौक, पुणे) यांना अत्याधुनिक डायलिसिस मशीन भेट दिली आहे. ही मशीन ब्रदरहुड फाउंडेशनचे संस्थापक, स्व. जयप्रकाश गोयल यांच्या पुण्यस्मरणार्थ समर्पित करण्यात आली आहे.

हॉस्पिटलच्या आवारात पार पडलेल्या साध्या पण भावनिक समारंभात गीता जयप्रकाश गोयल, अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या उपस्थितीत मशीनचे पूजन करून रुग्णसेवेसाठी समर्पित करण्यात आले.

या कार्यक्रमास लायन्स क्लब व अग्रवाल समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये लायन राजेंद्र मुच्छाल, विजय डांगरा, लायन विजय सारडा, लायन राजेश अग्रवाल, पीआयडी नरेंद्र भंडारी, राजेंद्र गोयल, विजय जाजू, दीपक कुदळे, बिपिन सेठ, फ्रेडी गोदरेज, आर. के. शाह, नीरज कुदळे, संजय अग्रवाल, पवन बंसल आदींचा समावेश होता.

हे पण वाचा  राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले

गीता गोयल म्हणाल्या, “स्व. जयप्रकाशजींचं स्वप्न होतं की कोणत्याही व्यक्तीला उपचाराच्या अभावामुळे वेदना सहन कराव्या लागू नयेत. ही मशीन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”

याच प्रसंगी श्री रामनिवास चेतराम अग्रवाल यांनीही आणखी एका मशीनच्या दानाची घोषणा केली. तसेच तनय मनोज अग्रवाल कुटुंब आणि सौ. शकुंतला द्वारकाप्रसाद बंसल कुटुंब यांच्याद्वारेही प्रत्येकी एक डायलिसिस मशीनचे दान करण्यात आले.

लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, आता हॉस्पिटलमध्ये ८ डायलिसिस मशीन कार्यरत आहेत आणि प्रत्येक महिन्यात ८०० ते १००० रुग्ण अत्यल्प शुल्कात उपचार घेत आहेत. लवकरच आणखी दोन मशीन सुरू केल्या जातील.

लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठी सेवा संस्था असून, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ११३ डायलिसिस मशीनद्वारे हजारो गरजू रुग्णांवर उपचार होत आहेत. १७ शैक्षणिक संस्था, ४००० पेक्षा अधिक नेत्रशस्त्रक्रिया, तसेच पॅथोलॉजी, डायबेटिक आणि व्हिजन सेंटर्ससह लायन्स क्लबचे कार्य अविरत सुरू आहे. येत्या काळात खराडी आणि पिंपरी-चिंचवड भागातही नवीन सेवा केंद्र सुरू केले जातील.

सर्व उपस्थित मान्यवरांनी गोयल कुटुंबाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण म्हटले.

About The Author

Advertisement

Latest News

समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक
मुंबई: प्रतिनिधी  तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवून समारोपाचे...
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज
बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांचे निधन
संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार
'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'
राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले

Advt