- राज्य
- अखेर नवाब मलिक अजित पवार गटात सक्रिय
अखेर नवाब मलिक अजित पवार गटात सक्रिय
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मिळाली मोठी जबाबदारी
मुंबई: प्रतिनिधी
दीर्घकाळ राजकीय विजनवास भोगल्यानंतर माजी मंत्री नबाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत मलिक यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी व्यावसायिक संबंध असल्याच्या कारणावरून तुरुंगाची हवा खावी लागलेले नवाब मलिक यांना दूर ठेवण्यासाठी दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाचा अजित पवार गटावर दबाव होता. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा पक्षात कार्यरत करण्यात आले आहे.
निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून पक्षाकडून लढवल्या जाणाऱ्या जागा, उमेदवारी, प्रचाराची दिशा आणि एकूणच निवडणुकांची रणनीती निश्चित करण्यामध्ये मलिक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. महायुतीने एकत्रपणे महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास जागा वाटपाच्या चर्चेत मित्रपक्षांबरोबर नवाब मलिक सहभागी असणार आहेत.