- राज्य
- वंशावळ समितीला ३० जून २६ पर्यंत मुदतवाढ
वंशावळ समितीला ३० जून २६ पर्यंत मुदतवाढ
मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय आहे.
मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्या संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वंशावळ समितीला देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली वंशावळ समितीची स्थापना 25 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली. या समितीची मुदत 30 जून 2025 पर्यंत होती. न्या शिंदे समितीच्या शिफारसीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे ही मुदत पुढील वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे.