'गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटा, पाच लाखाचे इनाम मिळवा'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख यांची घोषणा

'गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटा, पाच लाखाचे इनाम मिळवा'

ठाणे: प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये इनाम मिळवा, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन बदलापूर येथे करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करण्यात आला. 

यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले असून राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकर यांची कान उघाडणी केली आहे. 

हे पण वाचा  अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद

फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे यापुढे आपण अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणार नसल्याचे स्पष्टीकरण पडळकर यांनी देखील दिले आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या बद्दल केलेल्या विधानावर आपण ठाम असून त्याबद्दल माफी मागणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt