- राज्य
- कबुतरांना खायला घालण्याच्या वादाचे लोण आता पुण्यातही
कबुतरांना खायला घालण्याच्या वादाचे लोण आता पुण्यातही
बंदीच्या विरोधात स्वयंसेवी संस्थांनी दाखल केली याचिका
पुणे: प्रतिनिधी
न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने कबुतराखाने बंद केल्यानंतर मुंबईत घमासान सुरू असतानाच त्यांचे लोण पुणे येथे पोहोचले आहे. पुणे महापालिकेने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घातलेल्या बंदीच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे.
पुणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील २२ सार्वजनिक ठिकाणी कबुतदारांना खायला घालण्यास सन २०२३ मध्ये बंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जातो. याच मुद्यावर मुंबईत वाद पेटला असतानाच येथील शाश्वत फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याlचिका दाखल केली आहे..
कबुतरांची पिसे आणि विष्ठा यांच्यामुळे मानवी आरोग्याला धोका असल्यामुळे मुंबईत कबुतरखाने बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन यातून मध्यममार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. कबुतरांना खायला घालण्यासाठीच बंदिस्त व्यवस्था उभारणे, कबुतरांची विष्ठा साफ करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणे आणि निवासी परिसरातून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत कबुतराखान्यांचे स्थलांतरण करणे, असे उपाय विचाराधीन आहेत.