खुद्द बारामतीत अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन

छत्रपती संभाजी महाराजांचा कथित अवमान प्रकरणी भाजप कार्यकर्ते संतप्त

खुद्द बारामतीत अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन

बारामती : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केल्याने बारामती शहरातील पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग भवनसमोर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
 विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.   भाजप व शिवधर्म फौंडेशनने हे आंदोलन केले.  

बारामतीतल्या भाजप व शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन केल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद, धरणवीर अजित पवार अशा घोषणा दिल्या. भाजपच्या वतीने भिगवण चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवार यांचा पुतळा जाळला.

यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे व मच्छिंद्र टिंगरे यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर  बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

हे पण वाचा  न्यायवैद्यक प्रयोगशाळा करणार प्रलंबित चाचण्यांचा निपटारा

About The Author

Advertisement

Latest News

Advt