भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ

वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी व्यक्त केली मळमळ

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ

वॉशिंग्टन: वृत्तसस्था 

भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ आली आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताची रशियाकडून शस्त्र खरेदी आणि भारताचा ब्रिक्स संघटनेत सहभाग याबद्दल अमेरिकेच्या पोटातील मळमळ व्यक्त केली आहे. 

भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करत आहे. हा अमेरिकेला त्रास देण्याचा एक प्रकार आहे. भारत ब्रिक्स या संघटनेत सहभागी आहे. ब्रिक्स मधील देशांना डॉलरचे वर्चस्व मान्य नाही, असे लुटनिक यांनी एका मुलाखतीत सांगितले. भारत सरकारकडून अशा काही गोष्टी घडल्या आहेत की ज्याचे अमेरिकेवर वाईट परिणाम होतात, असेही ते म्हणाले. 

रशिया हा भारताचा विश्वासू मित्र आहे. भारताची सर्वाधिक शस्त्र खरेदी रशियाकडून केली जाते. तरी देखील भारत थेटपणे रशिया किंवा अमेरिका या दोन्ही देशांच्या दावणीला बांधला गेलेला नाही. भारताच्या हितानुसार भारत आपले परराष्ट्र धोरण निश्चित करेल, अशी भारताची त्रयस्थ भूमिका आहे. मात्र, भारत आणि रशियाची मैत्री अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील काही मंडळी भारतावर टीका करत असून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा  संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती

यापूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान ट्रम्प यांनी अतिउत्साह दाखवून भारत किंवा पाकिस्तान यांनी अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच दोन्ही देशातील युद्धविरामाची समाज माध्यमातून घोषणा करून टाकली. या युद्धविरामाचे श्रेय घेण्याची घाई ट्रम्प यांना झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य व्हावे लागले. मात्र, भारताने ट्रम्प यांना या युद्धविरामाचे श्रेय मिळू दिलेले नाही. दोन्ही देशांनी मिळून युद्धविरामाचा निर्णय घेतल्याचे भारताने स्पष्ट केले. ट्रम्प यांच्यापाठोपाठ त्यांच्या प्रशासनातील इतर काही लोक देखील भारतावर टीका करू लागले आहेत. 

About The Author

Advertisement

Latest News

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा' 'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'
मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जी इच्छा, तीच माझी...
शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !
पोटविकारांवर 50 वर्षांपासून प्रभावी ठरलेला धौती योग !
Vadgaon Maval | वाहनांच्या धडकेत फळ विक्रेत्याचा मृत्यू; रस्ता ओलांडताना महामार्गावर कान्हे फाटा येथे अपघात
Barti News | बार्टीच्या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत मध्ये यश
'अपात्र लाडक्या बहिणीसाठी न्यायालयाकडे मागणार दाद'

Advt