'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

भुजबळ यांना भाजपमध्ये जाण्याचे कार्यकर्त्यांचे आवाहन

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

नाशिक: प्रतिनिधी 

आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे मंत्रीपद डावललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. अवहेलना होत असलेल्या पक्षात न राहता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आवाहन कार्यकर्त्यांनी यावेळी भुजबळ यांना केले. 

नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ज्या पक्षात आपली अवहेलना होत आहे त्या पक्षात इथून पुढे न राहता भाजपामध्ये प्रवेश करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याकडे केली. 

आपल्याला मतदारसंघ एकसंध ठेवायचा आहे. मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे वेगाने पुढे न्यायचे आहेत. मी दीर्घकाळ वेगवेगळ्या मंत्रिपदावर काम केले आहे. तब्बल 40 वर्ष मी काम करतच आहे. त्यामुळे मला मंत्रीपदाचे अप्रूप नाही. आपला लढा हा मंत्रिपदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून हा लढा लढणे आवश्यक आहे, असे भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना आणि जनतेला विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही देखील भुजबळ यांनी दिली. 

हे पण वाचा  शासकीय कर्मचाऱ्यांना पुनर्विकासातून घरे देण्याचा निर्णय रद्द

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt