- राज्य
- शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका
शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका
दीपक केसरकर यांनी दिले संकेत
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेत दीर्घ काळापासून बंद पडलेली पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार असून लवकरच पक्षांतर्गत निवडणुका पार पडतील, असे संकेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
शिवसेना शिंदे गटाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबद्दल चर्चा झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेत अंतर्गत निवडणुकांची पद्धत संपुष्टात आली आहे. पक्षांतर्गत लोकशाही आणि निवडणुका याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यापूर्वी शिवसेनेच्या सर्व पदांसाठी पक्षांतर्गत निवडणुका होण्याची शक्यता आहे. ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पायाभरणी असेल, असे केसरकर यांनी नमूद केले.