"मनसे पाठिंबा देईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा...'

वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांची सूचना

पुणे: प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन मनसेने पाठींबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. महायुतीबरोबर प्रचार मोहिमेसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे, बाबू आगस्कर आणि किशोर शिंदे यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यांना थेट पंतप्रधान व्हायचे आहे, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी मोरे यांची खिल्ली उडवली. लोकसभेची निवडणूक लढविण्यापेक्षा त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीचा प्रचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे पण वाचा  विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप

About The Author

Advertisement

Latest News

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला
मुंबई: प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षश्रेष्ठींनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली...
महिन्याभरात न्याय मिळाला नाही तर...
न्यायवैद्यक प्रयोगशाळा करणार प्रलंबित चाचण्यांचा निपटारा
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट
'निष्ठावंतांचा पक्षत्याग ही चिंतेची बाब'
सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर
मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Advt